बाहे येथे अडकलेल्या 22 पर्यटकांची सुखरूप सुटका

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील पूई परिसरातील काही मंडळी बाहे येथील फार्म हाऊसला पर्यटनासाठी गेले होते. मात्र रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे त्या भागात प्रचंड पाणी साचल्याने ते अडकले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना सुखरूप बाहेर पडता येत नव्हते. याबाबत माहिती मिळताच रोहा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे पथक तसेच रिस्क्यू टीम, घटनास्थळी दाखल झाले. शर्तीच्या प्रयत्नानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Exit mobile version