। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या निवडणूकीचे मतदान सकाळपासून शांततेत सुरु आहे. साडेअकरा वाजेपर्यंत चार तासात 23.96 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. त्यात कर्जत 25.84 टक्के, अलिबाग 24.86 टक्के, माथेरानमध्ये 31.02, मुरूडमध्ये 30.63, श्रीवर्धनमध्ये 27.14 टक्के, खोपोलीमध्ये 20.47 टक्के, उरणमध्ये 21.44 टक्के, पेणमध्ये 24.68 टक्के, महाडमध्ये 25.05 टक्के व रोहामध्ये 24.87 टक्के मतदान झाले. साडेसात ते साडेअकरा वाजण्याच्या या कालावधीत 56 हजार 899 मतदारांनी मतदान केले. त्यात 30 हजार 224 पुरुष व 26 हजार 675 महिला मतदारांनी मतदानाचा बजावला असल्याचे सांगण्यात आले.
सुरुवातीपासूनच मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
