रायगडातील सहा नगरपंचायत निवडणुका-21 जागांसाठी 102 पैकी 23 अर्ज अवैध

79 उमेदवार रिंगणात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित करून घेण्यात येत असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गा जागांसाठी होणार्‍या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीतून 21 जागांसाठी 102 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीमध्ये 23 अर्ज अवैध ठरले त्यामुळे आता रिंगणात 79 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील सहा पैकी खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी एकूण 6 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 1 अर्ज अवैध ठरल्यानंतर आता 5 अर्ज शिल्लक राहिले आहेत. माणगावसाठी एकुण 16 अर्ज दाखल होते. ते सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले. म्हसळा नगरपंचायतीसाठी 9 दाखल अर्जांपैकी 1 अवैध ठरला तर 8 अर्ज वैध, पोलादपूरमध्ये एकूण 17 अर्जांपैकी 5 अर्ज अवैध ठरले तर 12 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. तळा नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी एकूण 26 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 8 अर्ज अवैध तर 18 अर्ज वैध ठरले आहेत. पालीत एकूण 28 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 8 अर्ज अवैध ठरले त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 20 अर्ज शिल्लक राहिले आहेत. ओबीसीतून खुल्या प्रवर्गात गेलेल्या या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर 19 जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाईल. 6 नगरपंचायतीतून 21 जागांसाठी 102 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीमध्ये 23 अर्ज अवैध ठरले त्यामुळे आता रिंगणात 79 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या 11 जानेवारी या शेवटच्या दिवशी निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Exit mobile version