रायगड जिल्ह्यात 239 नवे कोरोना रुग्ण

7 जणांचा मृत्यू तर 268 झाले कोरोनामुक्त
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज बुधवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी नव्याने 239 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 268 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
बुधवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 67, पनवेल ग्रामीण 26, उरण 15, खालापूर 18, कर्जत 14, पेण 8, अलिबाग 46, माणगाव 15, रोहा 8, श्रीवर्धन 1, म्हसळा 4, महाड 16, पोलादपूर 1 असे एकूण 321 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर मुरुड, तळा, सुधागड या तीन तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच पनवेल मनपा क्षेत्र, कर्जत तालुक्यातील प्रत्येकी दोन तर पेण, मुरुड आणि रोहा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बरे झाल्याने कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा 106, पनवेल ग्रामीण 24, उरण 10, खालापूर 18, कर्जत 9, पेण 6, अलिबाग 51, मुरुड 2, माणगाव 12, रोहा 15, श्रीवर्धन 8, म्हसळा 1, पोलादपूर 1 असे एकूण 268 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 57 हजार 005 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 60 हजार 995 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 010 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 2 हजार 641 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version