गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 25 खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विविध खेळांतील तब्बल 25 खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी सापडले आहेत. देशांतर्गत स्पर्धेत एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी खेळाडू दोषी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.जे खेळाडू दोषी सापडले आहेत त्यांच्यावर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडून (नाडा) हंगामी बंदी घालण्यात आली आहे.

ही स्पर्धा 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत झाली होती. दोषी ठरलेल्या बहुतांश खेळाडूंनी पदके जिंकलेली आहेत तसेच काही जण आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, कुस्ती, सायकलिंग, ज्युडो, फुटबॉल, वुशू आणि लॉन बाऊल्स यासह विविध खेळात सहभागी खेळाडूंनी मेटेनोलोन, मेथेंडियनोन, स्टॅनोझोलॉल आणि इतर ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स सारख्या प्रतिबंधित पदार्थांचा वापर केल्याचे अहवालातून समोर आले आहे. देशातील खेळाडूंना क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकडे पाहिले जाते.

यामध्ये सात पदक विजेत्यांचा समावेश आहे पण, डोपिंगमुळे खेळाडूंच्या कर्तृत्व कलंकित झाले आहे. नाडाने दोन खेळाडू वगळता सर्व खेळाडूंवर डोपिंग उल्लंघनाचा आरोप लावला आहे. खेळाडूंवर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, उत्तेजकाचे उल्लंघन केलेल्या खेळाडूंना दोन ते चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागते. 2015 मध्ये केरळमध्य झालेल्या राष्ट्रीय स्पर्धत 16 तर गुजराजमध्ये गतवर्षी झालेल्या स्पर्धेत 10 खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी सापडले होत.

कोणत्या क्रीडाप्रकारातील किती खेळाडू?
ॲथलेटिक्स 9, जलतरण 1, बिलियर्ड्स 1, बॉक्सिंग 2, सायकलिंग 1, कबड्डी 1, नेटबॉल 1, ट्रायथलॉन 1, वेटलिफ्टिंग 7 आणि कुस्ती
Exit mobile version