23 कोरोनामुक्त; तीघाजणांचा मृत्यू
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात आज गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या 25 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 23 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 18 हजार 925 झाली आहे. यापैकी 557 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, 17 हजार 973 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 395 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.