पुरग्रस्तांसाठी शेकापक्षातर्फे २५ हजार किलो अन्न धान्याची मदत

शेकापचा संपूर्ण जिल्ह्यातून मदतीचा ओघ

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरड आणि पूरग्रस्त ग्रामस्थांसाठी शेतकरी कामगार पक्षाने मदतीचा ओघ सुरू केला आहे. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते सर्व प्रकारची मदत एकत्रित करून पुरग्रस्तांसाठी पोहचवत आहेत. स्वतः चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून २५ हजार किलो अन्न धान्य देण्यात आले आहे. तर पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या कडून गाळ उपसण्यासाठी व स्वचछतेसाठी जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  

धान्य वाटप करताना काही प्रमाणात ते शिजवून देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. यासाठी शेकाप कार्यकर्ते कांदा कापण्यापासून ते शिजवून पॅकिंग करणे, वाटप करणे यासाठी झटत आहेत. यासाठी शेकाप चे ज्येष्ठ कार्यकर्ते आरडीसीसी बँकेचे संचालक अस्लम राऊत, माणगाव कृषी बाजार समितीचे सभापती निलेश थोरे पाटील हे समन्वय साधण्याचे काम करीत आहेत.  माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे, तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड, आरडीसीसी बँकेचे बँकेचे संचालक ज्ञानेश्वर भोईर, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य ऍड कौस्तुभ धामणकर, दीपक रसाळ, युवा नेते लहू चव्हाण तळा तालुक्याच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. वैभव चांदे हे देखील मदत पोहचवण्याचे काम करीत आहेत. पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आलेल्या मदतीतटी शर्ट, गाद्या यांचा देखील समावेश आहे.

Exit mobile version