19 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रविवार दि. 12 डिसेंबर रोजी कोरोनाच्या 26 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दिलासादायक म्हणजे उपचारादरम्यान सलग दुसर्या दिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शनिवारी पनवेल महापालिका हद्दीत 14, पनवेल ग्रामीण 4, खालापूर 1, कर्जत 1, पेण 4, अलिबाग 2 असे 26 रुग्ण आढळले. तसेच उरण, मुरुड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 289 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 524 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 578 वर गेला आहे. सद्यस्थितीत 187 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.