चिराग, साई राज यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राष्ट्रपती भवनात खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. क्रिकेटर मोहम्मद शमी, तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे यांच्यासह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकी रेड्डी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय पाच जणांना उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले. मंगळवार दि.09 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात पुरस्कार सोहळ्याचं वितरण पार पडला.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023
चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)
2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर एम (ॲथलेटिक्स), पारुल चौधरी (ॲथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाला (अश्वस्वार), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कब्बडी), रितू नेगी (कब्बडी), नसरीन (खो-खो), सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग), सुश्री ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), सुश्री अँटिम (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
ललित कुमार (कुस्ती), आर.बी. रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा ॲथलेटिक्स), शिवेंद्र सिंग (हॉकी), गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब).







