नवर्‍याने घराबाहेर काढताच सासर्‍याने केला विनयभंग

। पनवेल । वार्ताहर ।
नवरा-बायकोमधील शुल्लक कारणावरुन नवर्‍याने तिला घरबाहेर काढताच अश्‍लील वर्तन करीत सासर्‍याने 27 वर्षीय सुनेचा विनयभंग केला. ही घटना पनवेलमध्ये बुधवारी (दि.7) घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल शहरात राहणार्‍या पीडित महिलेला शुल्लक कारणांवरून पती, सासरे व सासूबाई यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नवर्‍याने तिला घरातून बाहेर काढले. त्यानंतर सासर्‍याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version