29 वर्षीय इसम बेपत्ता

| पनवेल | प्रतिनिधी |

विकास बाळासाहेब जवळके (29) नावाचा इसम राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बांधा मध्यम, नाक सरळ, चेहरा गोल, उंची 5 फुट 5 इंच, केस काळे लांब, डोळे काळे असून अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची नाईट पॅन्ट व पायात तपकीरी रंगाची स्लिपर घातलेली आहे. या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास नेरुळ पोलीस ठाणे 9702802323 किंवा पो.ह. प्रशांत बेलोटे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version