| पनवेल | वार्ताहर |
लोकल गाडीतून रेल्वे पटरीच्या बाजूस पडून एक इसम गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारार्थ प्रथम उपजिल्हा रूग्णालय पनवेल व त्यानंतर जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे नेण्यात आले आहे. याबाबत त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. खांदेश्वर ते पनवेल रेल्वे कि.मी. नं. 46/12-13 मध्ये प्रवास करीत असताना सदर इसम हा खाली पडला आहे. त्याचे अंदाजे वय 30 वर्षे, उंची 5 फूट 5 इंच, अंगाने मध्यम, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे मध्यम, दाढीमिशी मध्यम वाढलेली व काळी आहे. अंगात लाल पांढर्या चौकटीचा फूल शर्ट व पाढर्या रंगाची जीन्स पॅन्ट त्याच्यात काळ्या रंगाची जीन्स पँट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलिस ठाणे किंवा पो.हवा. शिंदे 9619666946 यांच्याशी संपर्क साधावा.