जिल्ह्यात 295 कोरोना रूग्ण

221 कोरोनामुक्त
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मंगळवारी रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये 295 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 368 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 221 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षरेत्रात 127, पनवेल ग्रामीण 37, उरण 12, खालापूर 14, पेण 40, अलिबाग 20, मुरुड 2, माणगाव 2, रोहा 8, सुधागड 1, श्रीवर्धन 5, म्हसळा 6, महाड 3 तर पोलादपूर 2 असे 295 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 103, पनवेल ग्रामीण 39, उरण 10, खालापूर 1, कर्जत 11, पेण 30, अलिबाग 16, मुरुड 1, माणगाव 3, रोहा 4, श्रीवर्धन 2, आणि महाड 1 अशा एकूण 221 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 19 हजार 503 झाली आहे. यापैकी 2 लाख  13 हजार 434 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 701 इतका आहे. सद्यस्थितीत 1 हजार 368 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version