| अलिबाग | प्रतिनिधी |
महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवाचा प्रमुख सण आहे. या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. तसेच, शिवाने तांडव नृत्य केले होते, असेही मानले जाते. हा दिवस अंधार व अज्ञानावर मात करण्याचे, अध्यात्मिक जागृतीचे आणि शिवाची पूजा व उपवास करून आत्मशुद्धी करण्याचे स्मरण आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असून दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो. यंदा हा उत्सव रविवारी (दि.15) सुट्टीच्या दिवशी आल्याने जिल्ह्यातील सर्व ठिकाणाच्या शिवमंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यादरम्यान ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’चा नाद सर्वत्र घुमला होता.

महाशिवरात्रीनिमित्त अलिबाग जवळील वेश्वी येथिल श्री गोकुळेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.


महाशिवरात्री निमित्त पनवेलच्या विरुपक्ष् मंदिरात हर हर महादेवचा गजर







