पेण | वार्ताहार |
पेण तालुक्यातील 298 अंगणवाडी सेविका आपले मोबाईल परत करणार आहेत. तालुक्यात जे मोबाईल देण्यात आलेले आहेत ते हे डिलीटी पॅनासॉनिक कंपनीचे असून हा मोबाईल वापरताना अंगणवाडीताईना मोठे अडथळे येत आहेत. मोबाईल 15 ते 20 मिनिटे चालल्यानंतर अतिशय गरम होऊन मोबाईल बंद पडतो. बर्याचदा भरलेली माहितीही डिलीट होते. काही अंगणवाडी सेविका या काही ज्येष्ठ असून त्यांना फारसा इंग्लिश जमत नसल्याने काम करताना खूप सार्या समस्या येत आहेत. याबाबत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे वेळोवेळी अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी येत आहेत विषय वरिष्ठांना कळवल आहे.याबाबत शासनाने निर्णय घ्यायचा आहे,असे ते म्हणाले.