। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील प्रा.शाळा मुठवली खु.या शाळेच्या दुरूस्ती कामासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 3 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे व तशाप्रकारचे निधी मंजुरीचे पत्र ग्रामस्थांना देण्यात आले आहे. साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुठवली खु.येथे सदिच्छा भेट देऊन गावात स्थानापन्न केलेल्या साखरचौथ गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शाळा दुरुस्तीसाठी मंजूर केलेल्या निधीचे पत्र ग्रामस्थांना दिले. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जयवंत मुंडे व पदाधिकारी मयूर खैरे, प्रसाद देशमुख, गाव कमिटी अध्यक्ष सतिष ठाकूर, युवा कार्यकर्ते महेश तुपकर, मारुती तुपकर, चंद्रकांत शिंदे, योगेश शिंदे, मंगेश तुपकर, रोहिदास तुपकर, संतोष तुपकर, प्रमोद ठमके, येनाजी शिंदे, नागेश खंडागळे, तानाजी ठमके आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शाळा दुरूस्तीसाठी 3 लाख रूपयाचा निधी मंजूर केल्याने मुठवली खु.ग्रामस्थांनी त्यांचे जाहीररित्या आभार व्यक्त केले.