तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात आज गुरूवार दि. 2 मे रोजी कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याची अलिबाग तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 251 झाली आहे. यापैकी 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 22 हजार 614 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 8 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.