| पुणे | प्रतिनिधी |
मावळमध्ये चौथ्या टप्प्यासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सर्वच उमेदवारांनी कंबर कसली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनीही उमेवादारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केला आहे. या प्रतिज्ञापत्रातून बारणे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 30 कोटींची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बारणे यांच्याकडे एकूण 114 कोटींची संपत्ती असून ते मावळमधील धनाढ्य उमेदवार ठरले आहेत.
2019 मध्ये श्रीरंग बारणे कुटुंबीयांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल 82 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली होती. आता मागील पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 30 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये बारणे कुटुंबीयांची संपत्ती 66 कोटी होती. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 82 कोटी झाली. म्हणजे गेल्यावेळी त्यांच्या संपत्तीत 35 कोटींची वाढ झाली होती. यंदा त्यांची संपत्ती 114 कोटी दाखवण्यात आली असून गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 30 कोटींनी वाढ झाली आहे.
त्यामुळे बारणे हे मावळमधील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. बारणे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे अलिशान गाड्या आहेत. तसेच हिरे आणि सोन्याचे दागिनेही आहेत, तशी माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. श्रीरंग बारणे हे दहावी नापास आहेत. शेती, बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी आदी व्यवसाय करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.