उरी सेक्टरमध्ये 30 किलो हेरॉईन जप्त

जम्मू | वृत्तसंस्था |
देशाच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. लष्कराने नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन जप्त केले आहे. त्याची किंमत 25 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन पिशव्या जप्त केल्या, ज्यात पाकिस्तानी चिन्हांसह पिशव्यांमध्ये 25-30 किलो हेरॉईन सारखा पदार्थ होता. बारामुल्ला पोलीस स्टेशमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी संयुक्तरित्या केलेल्या विशेष कारवाईत या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी 30 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. शनिवारी रात्री उशिरा नियंत्रण रेषेजवळील उत्तर काश्मीरच्या उरी शहरातून हे जप्त करण्यात आली. सुरक्षा दलांना नियंत्रण रेषेवर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. यानंतर, कारवाईमध्ये, त्यांना हेरॉईनच्या पिशव्या सापडल्या ज्या लपवल्या होत्या, अशी माहिती बारामुल्लाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिली.

Exit mobile version