नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्ली विमानतळावरून 12.9 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 90 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. सीमाशुल्क अधिकार्यांनी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करत युगांडाच्या दोन महिलांकडून हेरॉईन जप्त केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या दोघीही नैरोबी (केनिया) येथून अबू धाबी मार्गे भारतात आल्या होत्या. युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून आणि त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण जवळपास 13 किलो क्रिस्टलीय हेरॉईन जप्त करण्यात आले. दिल्ली विमानतळावर तैनात असलेल्या भारतीय सीमाशुल्काच्या श्वान पथकाने प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना शोध घेत या सामानात काही अंमली पदार्थ असल्याचे सूचित केले, असे अधिकार्यांनी सांगितले.