29 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 30 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 29 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये नव्याने एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल महापालिका हद्दीत 20, खालापूर 1, कर्जत 1, पेण 2, अलिबाग 5, महाड 1 असे एकूण 30 रुग्ण आढळले. तसेच पनवेल ग्रामीण, उरण, माणगाव , मुरुड, रोहा, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 891 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 112 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 573 वर गेला आहे. सद्यस्थितीत 206 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.