| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थ्यांपैकी आज आणखी ३१ विद्यार्थी सुखरुप परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देशवापसी झालेल्या विद्यार्थ्यांची एकुण संख्या ३१ झाली आहे. तर आता फक्त १ विद्यार्थी परत येण्याच्या मार्गावर आहेत. आजपर्यंत रायगडला आपापल्या घरी सुखरुप परत आलेल्यांमध्ये आर्यन पाटील ( पेण झिराड आळी), कोमल पाटील (पेण शिर्कि बोरावे), अभिजित अशोक थोरात (खोपोली), साहिल म्हामूणकर (पनवेल लाडीवली), मुग्धा मोरे (महाड), पूर्वा पाटील (अलिबाग धेरंड),समीक्षा शिरसाट (पनवेल खारघर), यश काळबेरे (तळा), श्रद्धा पाटील (पेण), प्रेरणा दिघे (पेण), अद्वैत गाडे (पनवेल), श्रेयस टिळे (पनवेल), रुशवंती भोगले (पनवेल), कुणाल कुवेसकर (पनवेल), शिल्पीता बोरे (पनवेल), अमर करंजीकर (माणगाव), खुरम बेरादर (बिरवाडी महाड), शोहिब पठाण (बिरवाडी महाड), सालवा धनसे (खोपोली), प्रचिती पवार (करंजाडे पनवेल), नाहुश गायकवाड (नागोठणे, रोहा), राजदिप सिंग, अलिबाग साळाव, आदित्य पाटील, खोपोली, मोहमद शेख, अनुजा जायले, कर्जत, आशिका चौबे, कामोठे, अनमोल शुक्ला कामोठे, गरिमा बाजपाल खारघर असे एकूण ३१ जण सुखरुप घरी पोहचले आहेत.