34 कोरोनामुक्त, 11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शनिवार दि. 6 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 32 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर दिवसभरात 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 11 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शनिवारी पनवेल महापालिका हद्दीत 15, अलिबाग 3, पनवेल ग्रामीण 7, पेण 3, उरण 4 असे 32 रुग्ण आढळले. तसेच खालापूर, कर्जत, रोहा, माणगाव मुरुड , तळा, सुधागड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या 11 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 396 झाली आहे. यापैकी 1 लाख 66 हजार 481 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 400 वर गेला आहे. सद्यस्थितीत 515 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.