रायगड जिल्ह्यात 33 रुग्ण; एकाचा मृत्यू

56 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रविवार दि. 31 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 56 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारी पनवेल महापालिका हद्दीत 19, अलिबाग 5, पनवेल ग्रामीण 5, खालापूर 1, कर्जत 2, माणगाव 1 असे 33 रुग्ण आढळले. तसेच उरण, पेन, रोहा, तळा, मुरुड, सुधागड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 179 झाली आहे. यापैकी 1 लाख 66 हजार 227 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 397 वर गेला आहे. सद्यस्थितीत 555 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version