| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील 15 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता 145 सदस्यपदाकरिता 278 उमेदवार 13 सरपंचपदाकरीता 36 उमेदवार रिंगणात उभे आहेत. ही निवडणूक 5 नोव्हेंबरला होत असुन या निवडणुकीकरिता 33,142 मतदार असून 16,484 पुरुष तर 16,658 स्त्री मतदार आहेत. एकदरा ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 6 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 2 उमेदवार रिंगणात असून या निवडणुकीकरिता 1,601 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 804 तर 797 महिला मतदारांचा समावेश आहे. आगरदांडा ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 19 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 2 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 1,574 मतदार असून यामध्ये पुरुष 777 तर 797 महिला मतदारांचा समावेश आहे.
राजपुरी ग्रामपंचायत 13 सदस्यपदाकरिता 21 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 3 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 3,818 मतदार असून यामध्ये पुरुष 1,908 तर 1,910 महिला मतदार आहेत. शिघ्रे ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 26 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 3 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 2,382 मतदार असून यामध्ये पुरुष 1,154 तर 1,228 महिला मतदार आहेत. विहुर ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 16 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी सरपंचपद बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीकरिता 2,284 मतदार असून यामध्ये पुरुष 1,095 तर 1,189महिला मतदार आहेत. नांदगाव ग्रामपंचायत 11 सदस्यपदाकरिता 40 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 9 उमेदवार रिंगणात असून या निवडणुकीकरिता 3,415 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 1,661 तर 1,754 महिला मतदार आहेत. काशिद ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 12 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 3 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 1,341 मतदार असून यामध्ये पुरुष 677 तर 664 महिला मतदार आहेत.
भोईघर ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 19 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 5 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 1,422 मतदार असून यामध्ये पुरुष 708 तर 714 महिला मतदार आहेत. मांडला ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 21 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 4 उमेदवार रिंगणात असून या निवडणुकीकरिता 1,358 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 685 तर 673 महिला मतदार आहेत. साळाव ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 30 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 4 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 1,569 मतदार असून यामध्ये पुरुष 795 तर 774 महिला मतदार आहेत. बोर्ली ग्रामपंचायत 11 सदस्यपदाकरीता 49 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 5 उमेदवार असून या निवडणुकीकरिता 3,886 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 1,909 तर 1,977 महिला मतदार आहेत. मिठेखार ग्रामपंचायत 11 सदस्यपदाकरिता 30 उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी सरपंचपद बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणूकीकरिता 2,351 मतदार असून यामध्ये पुरुष 1,995 तर स्त्री 1,156 महिला मतदार आहेत.
चोरढे ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 29 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 4 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 2,084 मतदार असून यामध्ये पुरुष 1,011 तर 1,073 महिला मतदार आहेत. वळके ग्रामपंचायत 11 सदस्यपदाकरिता 29 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 4 उमेदवारआहेत. या निवडणुकीकरिता 2,812 मतदार असून यामध्ये पुरुष 1,494 तर 1,318 महिला मतदार आहेत. तळेखार ग्रामपंचायत सात सदस्यपदाकरिता 22 उमेदवार तर सरपंचपदाकरीता 5 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता 1,245 मतदार असून यामध्ये पुरुष 611 तर स्त्री 634 महिला मतदार आहेत. या निवडणुकीत महिला मतदारांची मते उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहेत.
निवडणूक पूर्वतयारीची सज्जता रविवारी 5 नोव्हेंबर रोजी होत असून मुरूड तहसील निवडणूक विभागाकडून निवडणूक पूर्वतयारीची सज्जता झाली असल्याची माहिती तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली. त्यानुसार निवडणुकीतील मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता दरबार हॉल मुरूड येथे होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 6 टेबल्स लावले जाणार आहेत. निवडणुकीसाठी सुमारे 350 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.