। सांगोला । प्रतिनिधी ।
सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील पतंगे तलावाजवळ 34 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मंगळवारी (दि.12) बाळासो पाटील (रा.जुना आलेगाव- मेडशिंगी रोड, सांगोला) यांनी सांगोला पोलिसात माहिती दिली. महेश सावळा कसबे (रा. गोणेवाडी ता. मंगळवेढा) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांना समजले की, कमलापूर येथे पतंगे तळ्यानजीक एक व्यक्ती झाडास गळफास घेवून मयत झाला आहे. म्हणून र सदर ठिकाणी गेले असता त्यांना एकजण झाडास गळफास घेतलेला दिसला. त्या ठिकाणी बरेच लोक जमलेले होते. जमलेल्या लोकांपैकी गळफास घेतलेल्या व्यक्तीस ओळखले आणि त्याचे नाव महेश सावळा कसबे असल्याचे सांगितले.