उंबरखिंडीत 362 वा विजय दिन साजरा

विविध कार्यक्रमांचे आयोजन

| पाताळगंगा | वार्ताहर |

ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे हे जन्मगाव म्हणून प्रसिध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ही झालेली ही भूमी आणि सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व महिला सरदार रायबाघन यांच्या 30 हजार फौजेवर समरभूमी उंबरखिंड येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी ज्या महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता त्यापैकी ही एक लढाई आहे. म्हणून दरवर्षी चावणी येथे ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ चावणी पंचायत समिती खालापूर, रायगड जिल्हा परिषद, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या वतीने विजयदिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही 362 वा विजयदिन सोहळा समरभूमी उंबरखिंड चावणी येथे आयोजित करण्यात आला होता.


शिस्त आणि पारंपारिक खेळाबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा दिला. रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत खरोशी-पेण यांनी पोवाडा गाऊन शिवभक्तांना मंत्रमुग्ध केल. त्याच बरोबर शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी उंबरखिंडच्या इतिहासासमवेत शिवरायांची दूरदृष्टी आणि पारदर्शक राजा म्हणून त्यांच्या कार्याचा उपदेश दिला.

यावेळी शिव दुर्ग मित्र मंडळ लोणावळा गटविकास अधिकारी बालाजी पुरी, वरिष्ठ अधिकारी शिल्पा दास, विस्तार अधिकारी, खालापूर पोलीस उपनिरीक्षक आरोटे, विस्तार अधिकारी खालापूर शैलेंद्र तांडेल, ग्रामसेवक अविनाश पिंपळकर, सरपंच बाळासाहेब आखाडे, चव्हाण, वनरक्षक लोखंडे, ओव्हाळ, सूर्यवंशी, वरिष्ठ विस्तार अधिकारी एम.जी. शिंदे, अंकित साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ढोल पथक खोपोली यांनी ढोल वाजवून मानवंदना दिली.

Exit mobile version