35 कोरोनामुक्त, 9 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 37 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान आज चार रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात तब्बल 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 9 तालुक्यांमध्ये नव्याने एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरुवारी पनवेल महापालिका हद्दीत 15, पनवेल ग्रामीण 12, खालापूर 3, कर्जत 2, पेण 3, अलिबाग 1, रोहा 1 असे एकूण 37 रुग्ण आढळले. तसेच उरण, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड आणि पोलादपूर या 9 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 751 झाली आहे. यापैकी 1 लाख 66 हजार 961 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 567 वर गेला आहे. सद्यस्थितीत 223 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.