राष्ट्रीय लोक अदालतीत ३७,७६३ प्रकरणे निकाली

13 कोटींची तडजोड रक्कम वसूल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
दाखलपूर्व आणि प्रलबिंत सटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 37,763 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी माहिती दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयांत वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील वादपूर्व प्रकरणे व प्रलंबित अशी एकूण 98,623 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे 36,225 व प्रलंबित प्रकरणांपैकी 1538 प्रकरणे अशी एकूण 37,763 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्याव्दारे पक्षकारांना एकुण 13 कोटी 29 लाख 08 हजार 526 रूपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.


23 जोडप्यांचा संसार जुळला
रायगड जिल्हयातील लोकन्यायालयात 23 जोडप्यांचा (अलिबाग येथील लोकन्यायालयात 7. कर्जत 1, माणगाव 2, पाली 1, रोहा 5 महाड 6, पनवेल 1 सामंजस्याने वाद मिटल्यामुळे नादांयला गेली. अलिबाग येथील पक्षाकरांचा प्रमुख जिल्हा न्यायाधिश एस. एस. सावंत, व पॅनलवरील न्यायधिशांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत 28 लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करूनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड, पोलीस अधिक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत व न्यायाधीश तथा सचिव श्री. अमोल अ. शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version