माणगाव तालुक्यात 38 नवे कोरोनाग्रस्त

। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण जगात गेली वर्षभरापासून हैदोस माजविणार्‍या कोरोना महामारीमुळे सर्वजण जेरीस आले आहेत.या महामारीची दुसरी लाट दोन महिन्यापासून आली असून रायगड जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे.

नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचे लसीकरण

माणगाव तालुक्यात 1 जूलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवे 38 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून 41 रुग्ण स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्यात आता 278 रुग्ण बाधित असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. माणगाव तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती.काहींना या महामारीमुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी पडल्याने जीव गमवावे लागले.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील वाढत प्रादुर्भाव पाहून सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन करून केंद्राने जनता कर्फ्यू लागू केला होता.त्यावेळी तारेवरची कसरत करून शासन व प्रशासन यांनी नागरिकांच्या सहकार्याने या महामारीवर मत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.पहिल्या टप्प्याचा कोरोनाचा जोर थोडासा कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊन खुले करण्यात आले .मात्र आता कोरोनाची दुसरी लाट पुन्हा सर्वत्र आली आहे.रायगड जिल्ह्याबरोबरच माणगाव तालुक्यात कोरोनाचे सातत्याने दररोज रुग्ण आढळत आहेत.

त्यामुळे माणगावकरांनी शासनाने विविध कार्यक्रम,समारंभ,मैदानी स्पर्धा यांच्यावर लादलेले निर्बंध तसेच घातलेले नियम,अटी व शर्ती यांची कडक अंमलबजावणी करून या महामारीला आपण सारेजण मिळून सामुदायिक प्रयत्नांनी तालुक्यातून हद्दपार करू असे आवाहन तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

Exit mobile version