कर्फ्यू नंतरचे नेमके निर्बंध काय?
। अमरावती । वार्ताहर ।
अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला व या कर्फ्यूनंतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे शहरात काय सुरू राहणार आणि काय बंद यावर अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील अमरावती शहरात हिंसाचारानंतर प्रशासनाने 4 दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आलीय. इंटरनेटवरील निर्बंध 3 दिवसांसाठी असणार आहे. एकूणच अमरावतीत कर्फ्यू लागू झाल्यानं अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत. यामुळे शहरात काय सुरू राहणार आणि काय बंद याविषयीचा हा खास आढावा.
शहरात नेमके कोणते निर्बंध?
12 आणि 13 नोव्हेंबरला झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलीस आयुक्त संदिप पाटील यांनी शहरात कलम 144 लागू करत कर्फ्यूचे आदेश दिलेत. यानुसार आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घरााबाहेर पडता येणार नाही. 5 किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत. हे सर्व निर्बंध कर्फ्यूबाबतचा पुढील आदेश येईपर्यंत लागू असतील.