। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील कळंबोली-पुणे हायवे रोडवर अमेठी युनिव्हर्सिटी समोरच एका फोर्ड इंडिव्हर गाडीच्या चालकाने त्याच्या पुढे चाललेल्या वॅगेनार गाडीस जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात त्या गाडीतील 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्या जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.