डिकीचे लॉक तोडून 4 मोबाइलची चोरी

। पनवेल । वार्ताहर ।
तालुक्यातील मोहोदर येथे नदीच्या काठी फिरायला गेले असता चोरट्यांनी गाडीच्या डिकीचे लॉक तोडून 58 हजार रुपये किमतीच्या चार मोबाईलची चोरी केली आहे. मिडल क्लास सोसायटी पनवेल येथील वर्षा अभय पाटील या त्यांच्या कुटुंबासह काळया पिवळ्या रंगाची इको कार एम एच 46 बीएफ 2885 ने येथे नदीच्या काठी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांचे चार मोबाईल इको कारमध्ये ठेवले. व ते जेवण करण्यासाठी गेले जेवण झाल्यानंतर सर्वजण गाडीजवळ आले. यावेळी त्यांनी दरवाजा उघडून मोबाईल पाहिले असता मोबाईल दिसून आले नाही. मोबाईलचा शोध घेतला मात्र यावेळी डिकीचे लॉक तोडल्याचे त्यांना दिसून आले. चोरट्याने 58 रुपये किमतीचे 4 मोबाइल चोरून नेल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version