रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान

। कर्जत । प्रतिनिधी ।
प्रभू श्री विश्‍वकर्मा सुतार समाज कर्जतच्या वतीने विश्‍वकर्मा प्रकटदिन व मंदिराच्या रौप्यमहोत्सव दिनानिमित्त समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 40 जणांनी रक्तदान केले. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी कर्जत-खालापूर तालुक्यातील हे 466 वे शिबिर होते.

आकुर्ले येथील मंदिराच्या सभागृहात रक्तदान आयोजन करण्यात आले होते. वनक्षेत्रपाल प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या हस्ते प्रभू विश्‍वकर्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेविका प्राची डेरवणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, माजी नगरसेवक मिलिंद चिखलकर, पांचाळ, विजय डेरवणकर आदी उपस्थित होते.

विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र तेरेदेसाई यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. समर्पण ब्लड बँकेचे डॉ. एम.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री लाड, शीला वाघमारे, माधुरी सावंत, लक्ष्मण नाईक, प्रदीप नितोरे, प्रकाश येवले, नागेश म्हादे, अभिषेक मोर्या, सुनील निळे यांनी रक्तसंकलनाचे काम केले. आमदार थोरवे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, मुकेश सुर्वे, अभिषेक सुर्वे, दिनेश कडू आदींनी शिबिरास भेट दिली. यावेळी 40 जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी 71 वे रक्तदान केले.
याप्रसंगी विनोद पांडे, जयवंत म्हसे, कृष्णा जाधव, अनिस मणियार, प्रशांत उगले, प्रकाश शहा आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version