| कर्जत | प्रतिनिधी |
माजी मुख्यमंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले कर्जत खालापूर तालुक्यातील 479 वे रक्तदान शिबीर ठरले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत शहराच्या वतीने शिवालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, महिला आघाडीच्या करुणा बडेकर, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, समीर साळोखे, नितीन धुळे, सुरेश गोमारे, अविनाश भासे, प्रथमेश मोरे वैभव पेठे आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात प्रथम रक्तदान सुमित चंदन व भगवान बांगर यांनी केले. एकूण 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, वयाच्या 65 व्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी आपल्या जीवनातील 74 वे रक्तदान केले. रक्तसंकलानाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्त सेंटरचे डॉ. ए.एम. शेख, लक्ष्मण नाईक, प्रदीप नितोरे, प्रकाश आयवळे, शीला वाघमारे, सायली राणे, धनश्री लाड, राहुल साळवे, सोहम जाधव, सुरेश जाधव, सूरज जाधव, अनिकेत जाधव, राहुल शर्मा, स्वप्नील जाधव यांनी केले. याप्रसंगी माजी नगरसेवक संतोष पाटील, निलेश घरत, कामिनी दांडेकर, पांडुरंग बागडे, राजेश जाधव, सरपंच प्रमिला बोराडे, अरुण निघोजकर, मयुरी गजमल, केतन देशमुख, सोनू ठाकरे, शशिकांत मोहिते,चेतन मिसाळ, प्रशांत खांडेकर, प्रणल लाले, रोहित साळोखे, दत्तात्रय ओंबाळे, अदिती गुरव, किशोरी शिगवण, संगीता गुरव, छाया सावंत, कविता पाटील, विवेक साळोखे, पंढरीनाथ राऊत, जयेश उतेकर, राकेश झोमटे, हरीश कराळे, सुजाता मोहिते, बरेश्मा शिंदे, प्राची मनवे, लक्ष्मण पोसाटे आदी उपस्थित होते.