माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित 40 प्लस रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट प्रिमिअर लीग स्पर्धेचे आयोजन 23 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचेउद्घाटनअलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडले. यावेळी समीर चौगूले, अमित नारे, सागर पाटील, राकेश चव्हाण, बाळा पाटील, विकास दामले आदी मान्यवर, संघ मालक व खेळाडू उपस्थित होते.
अलिबागमधील क्रीडाभुवन मैदानात तीन दिवस सामन्यांचा थरार अलिबागकरांना पहावयास मिळणार आहे. ही स्पर्धा पोलादपूर ते पनवेल, खोपोली ते नेरळ, अलिबाग ते श्रीवर्धन, पेण, रोहा, उरण ते खारघर हद्दीपर्यंत मर्यादीत आहे.
अंतिम सामना रविवारी (दि.25) होणार आहे. या सामन्यानंतर स्पर्धेत प्रथम क्रमांकाला एक लाख 11 हजार 111 रुपये व चषक, व्दितीय क्रमांकाला 77 हजार 777 रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकाला 66 हजार 666 व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाला एलईडी टीव्ही, मालिकावीराला दुचाकी आणि प्लेअर ऑफ द डे खेळाडूला सायकल देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा यूट्यूबवर प्रेक्षकांना घर बसल्या पहाता येणार आहे.