। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील क्रिडाभवन येथे एमसीसी क्रिकेट क्लबतर्फे प्रशांत नाईक चषक -2022 स्पर्धेचे शनिवारी (दि.5) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अनिल चोपडा तसेच ईकबाल सैय्यद, नसीम बुकबाईंडर, अजगर सैय्यद, अफजल सय्यद, वसीम साखरकर, असीम पालकर, जमाल सय्यद, जाहिद बुकबाईंडर आदी उपस्थित होते.