। खांब-रोहा । वार्ताहर ।
कोलाड विभागातील वीस अंगणवाडी केंद्रात पोषण आहार पोटलीचे वाटपाचा कार्यक्रम दि.4 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्धारातून आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणीचा भाग म्हणून एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत अन्नदातर्फे स्वामीराज फाऊंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध अंगणवाडी केंद्रातील सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील कुपोषित बालकांना पौष्टीक आहाराचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोलाड विभागातील 20 अंगणवाडी केंद्रातील कुपोषित मुलांसाठी पाच किलोच्या 315 पोषण पोटलीचे वाटप कोलाड अंगणवाडी केंद्रात करण्यात आले.
या कार्यक्रमाला अन्नदाचे दिपेश, रोहा अंगणवाडी बिट सुपरवायर घाडगे, तलाठी मनोरे, स्वामीराज फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश माने, कार्यकारी सदस्य उमेश वादल, राजेश जाधव, खजिनदार मारुती चव्हाण, महिला सक्षमीकरण अध्यक्ष संजीवनी माने, सहखजिनदार विनायक माने व कोलाड बिटमधील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.