। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुढील तीन वर्षांत 400 वंदे भारत गाड्या धावणार आहेत. येत्या तीन वर्षांत या गाड्या चालवल्या जातील. याशिवाय 100 पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे अर्थसंकल्पामध्ये सुवर्ण चतुर्भुज मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मार्गांवर ताशी 180 ते 200 किमी वेगाने धावणार्या वंदे भारत एक्सप्रेस सेमी-हायस्पीड ट्रेन्स चालवण्याची घोषणा केली आहे. नवीन ट्रेनमध्ये रिक्लाइनिंग सीट्स, बॅक्टेरिया फ्री एअर कंडिशनिंग सिस्टीमचा वापर, पुशबॅक फीचर मिळेल. ट्रेनच्या तापमानापासून ते प्रत्येक इलेक्ट्रिक बोर्डपर्यंत सर्व आवश्यक यंत्रणांचे निरीक्षण करण्यासाठी एक केंद्रीकृत कोच असेल, जिथे संपूर्ण ट्रेनचे निरीक्षण केले जाऊ शकते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन खिडक्या असतील ज्यातून प्रवाशांना बाहेर काढता येईल.
ट्रेनमध्ये पावसाळा आणि पूरसदृश परिस्थितीसाठी खास डिझाइन केलेले उपकरणे असतील जेणेकरुन पाण्याच्या संपर्कात ते खराब होऊ नये. याशिवाय प्रत्येक डब्यात खास मोठे दिवे असतील जे दीर्घकाळ टिकतील. वीज खंडित झाल्यास तीन तास व्हेंटिलेशन देखील उपलब्ध असेल. याशिवाय प्रत्येक डब्यात आपत्कालीन पुश बटणांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ट्रेनच्या एका डब्यात दोन बटणे होती, नवीन ट्रेनमध्ये चार बटणे असतील. तसेच प्रवासी माहिती प्रणाली आणि डोअर सर्किट्समध्ये फायर सर्व्हायव्हल केबल्सचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून आग लागल्यास दरवाजे आणि खिडक्या उघडता येणार आहेत.