| महाड | प्रतिनिधी ।
महाड शहरात शनिवारी (दि.3) धाडसी घरफोडीची घटना घडली होती. सुरुवातीला यामध्ये नऊ लाखांचा ऐवज लुटल्याची प्राथमिक माहिती होती. आता मात्र पोलीस तपासात या घरफोडीच्या गुन्ह्यात तब्बल 43 लाख रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केल्याचे उघड झाले आहे.
शहरातील प्रभात कॉलनी या मध्यवर्ती ठिकाणचे रहिवासी असणारे प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनजी शेठ यांच्या घरामध्ये शनिवारी पहाटे ही धाडसी घरफोडी झाली होती. सुभाष शेठ यांचा मुलगा आणि सून बाहेरगावी गेले होते. या कालावधीत शेठ हे आपल्या पत्नीसोबत महाड तालुक्यातील अन्य घरात वास्तव्यास होते. या कालावाधीत चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारला. शेठ यांचा मुलगा परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघड झाला होता. नूतन पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
‘त्या’ घरफोडीत 43 लाखांचा ऐवज लंपास
