अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगडातील लालपरी अजूनही डेपोतच बंद असून,ती पूर्ववत कधी होणार याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील पाच डेपोतून दिवसभरात 80फेर्या झाल्या तर तीन डेपोत अजुनही संपच सुरुच असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
रायगडातील माणगाव,महाड,श्रीवर्धन,रोहा,पेण या डेपोतून तुरळक प्रमाणात एसटी वाहूतूक सुरु आहे.तर अलिबाग,कर्जत आणि मुरुड डेपो पूर्णपणे ठप्प झाला आहे.मंगळवारी 47 एसटी कर्मचार्यांना निलंबित करण्यात आल्याचे बारटक्के यांनी सांगितले.