। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रवीवार दि. 26 डिसेंबर रोजी कोरोनाच्या 48 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारी पनवेल महापालिका हद्दीत 36, पनवेल ग्रामीण 2, पेण 2, अलिबाग 5, तळा 1 असे 48 रुग्ण आढळले. तसेच उरण, कर्जत, माणगाव, मुरुड, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 668 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 785 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 587 वर गेला आहे. सद्यस्थितीत 296 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत