बायकोच्या वाढदिवसाचा केक पडला 48 हजारांना

| नवीन पनवेल | वार्ताहर |
बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागवलेल्या केकच्या ऑर्डरचे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 20 टक्के सूट मिळेल असे आमिष दाखवून तब्बल 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. आरोपींविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे, सेक्टर 6 ए येथे राहणारे निशांतकुमार अनिलकुमार झा यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने त्यांनी इंटरनेटवर सर्च करून मेरवांस केक शॉप साइटवर जाऊन केकची ऑर्डर दिली. यावेळी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 20 टक्के सूट मिळेल, असे आमिष निशांतकुमार यांना दाखवण्यात आले. त्यांनी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले. त्यानंतर त्यांनी बिलिंग प्रोसेस व जुना डाटा डिलीट करण्यासाठी दहा रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगून व क्रेडिट कार्डचा तपशील घेऊन निशांत कुमार यांची 48 हजार रुपयांची फसवणूक केली. यावेळी त्यांना ऑर्डर केलेला केकसुद्धा मिळाला नाही.

Exit mobile version