जिल्ह्यात 49 हजार नवीन मतदार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार एकूण 22 लाख 52 हजार 203 मतदार असून, अंतिम यादीमध्ये नव्याने 49 हजार 414 मतदारांची नव्याने वाढ झाली असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांच्याकडून मिळाली आहे. रायगड जिल्हयातील एकूण नदार :- दिनांक 01.01.2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत एकूण 22 लाख 82 हजार 203 स्त्री (1119279), पुरुष (1162900) तृतीय पंथी (24) मतदार आहेत. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशाप्रमाणे दरवर्षी प्रमाणे दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


या वर्षी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका Making Elections Inclusive, -ccessible and Participative हे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. सदर कार्यक्रम कोविड परिस्थिती विचारात घेऊन जिल्हास्तरावर मतदार संघस्तरावर, तालुका स्तरावर व मतदान केंद्रस्तरावर जास्तीत जास्त ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. पंचायत राज संस्था, शैक्षणिक संस्था, नागरी सामाजिक गट, एनएसएस, एनसीसी, स्काऊट व गाईटस, एनवायकेएस इत्यादी युवकांच्या स्वयंसेवी संस्था, मिडीया अशा विविध संस्था संघटनांचा सहयोग घेऊन राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम हा ऑनालईन मोडमध्ये नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे व कोविडची आचारसंहिता पालन करुन हा कार्यक्रम आयोजित करणेचा आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या शपथ घेणे, पोष्टल बॅलेट पेपर सुविधा, वोटर हेल्पलाईन अ‍ॅप, इथिकल मतदान इत्यादी वरील स्थानिक भाषेतील जनजागृतीपर व्हिडीओ व क्रिएटिव्ह सदर कार्यक्रमामध्ये दाखविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय मतदार दिनाच्या थिमनुसार जे व्हिडीओ व क्रिएटिव्ह तयार करणेत येणार आहेत, ते सर्व व्हिडीओ व क्रिएटिव्ह सर्वाना व्हाटस अ‍ॅप व इतर माध्यमांद्वारे शेअर करणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणेत येत आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता पी.एन.पी.नाटयगृह चेंढरे, अलिबाग येथे खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा घेणेत येणार आहे.


नविन नोंदणी झालेल्या मतदारांना मा.भारत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी ही घोष वाक्य लिहिलेले बॅचेस व e-EPIC देण्याचा कार्यक्रम होईल. मतदार यादी संदर्भात उत्कृष्ठ काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, उत्कृष्ट सहा. मतदार नोंदणी अधिकारी, उत्कृष्ट निवडणूक नायब तहसिलदार, उत्कृष्ट महसूल सहाय्यक, उत्कृष्ट डाटा ऑपरेटर, उत्कृष्ट सामाजिक संस्था यांची नांवे घोषित करुन नंतर त्यांना प्रमाणपत्र पाठविण्यांत येणार आहेत. तसेच शाळा, कॉलेज, संस्था यामध्ये झालेल्या विविध स्पर्धा जसे निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा इ. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यांत येणार आहे. 12 वा राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने, महिला, युवक, अपंग व्यक्ती यांचा सदर कार्यक्रमात समावेश करुन घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने नव मतदारांचे, महिला, अपंग, तृतीयपंथी, देहव्यवसाय करणा- ह या मतदारांचे व्हिडीओ क्लिप (बाईटस) घेण्यांत येणार आहेत. रायगड जिल्हयातील एकूण नदार :- दिनांक 01.01.2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत एकूण 22 लाख 82 हजार 203 स्त्री (1119279), पुरुष (1162900) तृतीय पंथी (24) मतदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version