। पनवेल । वार्ताहर ।
5 लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे. कामोठे वसाहतीमधील सेक्टर 8 येथील बेस्ट एम्प्लॉईज रायगड सोसायटीमध्ये महेंद्र कोंडाजी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांनी लक्ष्मी पुजनानिमित्त आपले सर्व दागिने बाहेर काढून हॉल लगत असलेल्या देवघरात पुजनासाठी ठेवले होते. सदर पुजनानंतर ते दागिने देव्हार्यात होते. दरम्यानच्या काळात अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून सदर दागिने लंपास केल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.