। कर्जत । प्रतिनिधी ।
रेल्वे ब्लास्ट मधील पीडित कुटुंबाला आ.महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्यामुळे 50 लाखाचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. चौकजवळील वावर्ले-वडविहीर येथे रेल्वेच्या कामासाठी करण्यात येणार्या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन दोघाजणांचा नाहक मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांचा मोठा उद्रेकही झाला होता. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यास नकार देणार्या ठेकेदारासह संबंधित दोषींवर पोलिसांनी कारवाई केली होती.
या दुर्घटनेत कर्जत तालुक्याच्या किरवली येथील देवाकाबाई बडेकर (आई) सचिन बडेकर (मुलगा) या दोघांना नाहक जीवाला मुकावे लागले असताना या कुटुंबाचा आधारच हरवल्याने कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. नागपूर अधिवेशन संपून थोरवे यांनी तातडीने या कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबाला मदतीचा शब्द दिला. अखेर रेल्वेच्या ठेकेदार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून बडेकर कुटुंबाला आमदारांनाच्या पाठपुराव्यामुळे 50 लाख मदतीचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला.