| पनवेल | प्रतिनिधी |
स्टॉक मार्केटिंगबाबत माहिती देणार असून त्यात ट्रेडिंग करण्यास सांगून 50 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रगती बगाडिया या महिले विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विश्वजीत बसक हे खारघर सेक्टर 4 येथे राहत असून त्यांना प्रगती नावाच्या महिलेकडून स्टॉक मार्केटिंगबाबत माहिती देणार असल्याचा मेसेज आला. यावेळी ते व्हाट्सअप वर बोलू लागले. त्यांना लिंक पाठवून फॉर्म भरण्यास सांगितला. त्यानंतर एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितला. यावेळी खात्यामध्ये 10 हजार रुपये पाठवले. त्यानंतर 50 लाख रुपये इन्वेस्ट करा आणि रकमेच्या 20 टक्के नफा मळेिल, असे सांगितल्याने त्यांनी पैसे पाठवले. त्यांना 86 लाख रुपये नफा दाखवला. परंतु, पैसे काढण्यास गेले असता पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे आणखी 50 लाख रुपये इन्वेस्ट करा मग पैसे येतील, असे सांगितल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पनवेलमध्ये 50 लाखांची फसवणूक
