मुरूड ग्रामीण भागात 50 टक्के लसीकरण पूर्ण

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील 74 गावावातील ग्रामस्थांचे कोविड लसीकरण 50 टक्के पूर्ण झाल्याची माहिती मुरूड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ संजीव दुबे, यांनी शनिवारी बोलताना दिली.
लसीकरणा बाबत ग्रामीण भागात सामाजिक प्रबोधन आवश्यक असते. आमच्या अंगणवाडी , आशा सेविका, आरोग्य कर्मचारी वृंद, अधिकारी वर्ग, मी स्वतः गणेशोत्सव काळात अपार मेहनत घेऊन आगरदंडा भागातील चाकरमानी बांधवांचे प्रबोधन करून लसीकरण पूर्ण केले.बोर्ली भागातील 47 गावांतून 8340( प्रथम डोस) तर आगरदंडा भागात 7963 ग्रामस्थांनी लस घेतली.दुसरा डोस 3594(बोर्ली) तर 2247 ( आगरदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत देण्यात आले आहेत.ग्रामीण भागात बहुतांश वर्ग मजुरी अथवा मुंबईत कामांसाठी असतो. त्यामुळे लसीकरणासाठी त्यांना प्रवृत्त करणे जिकरीचे काम असते.परंतु आम्ही आणि आमच्या सर्व आरोग्य सेवक आणि सेविकांनी घरोघरी जाऊन मंदिरे, समाज मंदिरे आदी ठिकाणी जाऊन लसीकारणाचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. प्रत्यक्ष फील्ड वर्क वर आम्ही काम केल्याने या डोंगरी तालुक्यात आता पर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती डॉ संजीव दुबे यांनी दिली. तालुक्यात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार करणारं असून या कामी सर्वांचे परिश्रम आवश्यक असल्याचे मत डॉ संजीव दुबे, यांनी व्यक्त केले.ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असून या राष्ट्रीय कामात सर्वांचे योगदान आणि परीश्रम आवश्यक असल्याचे डॉ संजीव दुबे, यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version