अरे बापरे! अलिबागमध्ये रस्त्यावर 500 च्या नोटांचा पाऊस

| अलिबाग | प्रतिनिधी |
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच अलिबाग तालुक्यामधील गोंधळपाडा रस्तावर पैसे पडल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणूकीत असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अलिबागमधील गोंधळपाडा रस्त्यावर नागरिकांना पैसे सापडले आहेत. हे रस्त्यावर पडलेले पैसे लोकांनी उचलून नेले. मिळालेल्या माहितीनूसार, अलिबागमधील स्थानिकांना पाचशे रूपयांच्या नोटा रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे सापडल्याने चर्चांना जोरदार उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रस्त्यांवर पडलेले पैसे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्यावर पडलेल्या नोटा आणि पैशांचे बंडल पाहून अनेक नागरिकांनी हात साफ केला आणि पडलेले पैसे उचलून तेथून पसार झाले. तर काही जागृक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देत हे रस्त्यावरील पैसे पोलिसांच्या ताब्यात दिलेत.

Exit mobile version