शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल?

| मुंबई | वार्ताहार |

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर वाहनांना किती टोल असणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष होते. अखेर या सागरी सेतूवरील टोल रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल असणार असल्याची माहिती आहे. गुरुवारी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारी नाशिक दौर्‍यावर असणार आहेत. त्याच वेळी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. या सागरी सेतूचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतरही उद्घाटन होत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

Exit mobile version